खोट्या केसेस करण्यापेक्षा शहराचा विकास करा – किरण काळे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांच्यावर शहरातील आय टी पार्क मध्ये पाहणी करत असताना एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

या प्रकरणाबद्दल खुलासा करण्यासाठी आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एका पत्रकार परिषदेचा आयोजन केला होता. या पत्रकार परिषदेत काळे यांनी सर्व बाबींचा खुलासा करत पाहणी वेळीचे सर्व चित्रिकरण पत्रकार परिषदेत दाखवले.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाण साधत आमच्यावर खोट्या केसेस करण्यापेक्षा शहराचा विकास करावा आणि आय टी पार्क च्या मुद्द्यावर सामोरा समोर येऊन चर्चा करा, असे आव्हान केलं आहे.

आमदारांचे गुंड कार्यकर्ते खोट्या केसेस करण्याचे उद्योग अनेक दिवसांपासून सुरू असून आम्ही या रावणरुपी गुंडांचे दहन माजी आमदार अनिल राठोड यांच्या विचारातून करणार असल्याचे किरण काळे यांनी स्पष्ट केले माता-बघीणींना पुढे करून खोटे गुन्हे दाखल करण्याची आमदारांची जुनीच सवय आहे.

आयुर्वेद नावाचा आमदारांचा आणि त्यांच्या गुंडांचा अड्डा आहे, तेथून हा प्रकार चालतो. त्या बहिणीवर आमदार व त्यांच्या समर्थकांनी दबाव टाकून खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. आमदार व त्यांच्या समर्थकांनी दबाव आणल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असावा, त्यामुळे आमची पोलिसांबद्दल आमची तक्रार नाही.

आयटी पार्कबाबत आजही आमचे चर्चेचे आव्हान खुले आहे. आमदारांनी आपल्याकडे असलेले पुरावे घेवून आमच्या प्रश्नांना जाहीरपणे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा दिले. काळे यांनी दाखविलेल्या सीडीमध्ये ते आयटी पार्कमध्ये काम करणार्‍या युवक-युवतींशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe