आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी तेथे कॉल सेंटर चालवले जात आहे !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  राष्ट्रवादीचे आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकून, खोटी फिर्याद देण्यासाठी संबंधित महिलेला भाग पाडले असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला.

आमच्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत. ही माझी व माझ्या सहकाऱ्यांची अग्निपरीक्षा आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. काळे म्हणाले, या अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण की आम्ही स्वच्छ आहोत.

आयटीपार्कची पाहणी करतांना कोणत्याही महिलेचा विनयभंग, अथवा शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी केली नाही. आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी तेथे कॉल सेंटर चालवले जात आहे. या कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही.

तेथे बाचाबाची अथवा ज्या पद्धतीने फिर्यादीमध्ये उल्लेख केला आहे, तशी घटना घडलेली नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, आयटी पार्कच्या पाहणीचे चित्रीकरणही या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले.खोटे गुन्हे दाखल करणे ही या आमदारांची ही आजची सवय नाही.

हिंमत असेल तर समोर या आयटी पार्कच्या इमारतीत बसा आम्ही पुराव्यानिशी प्रश्न विचारू तुम्हीही पुराव्यानिशी उत्तरे द्या. मात्र, महिलांना पुढे करणेही हे लाजीरवाणे आहे, असेही काळे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe