अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन दिवसापासून नगर जिल्ह्यातला पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीतील पाणी कमी झाल्यामुळे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
चार दिवसात पंचनामे पूर्ण होऊन प्रशासन अंतिम अहवाल राज्य सरकारला पाठवणार आहे. जिल्ह्यात येत्या दोन दिवसात विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढच्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.
नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याचेही निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम