अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अक्षरश नद्या नाले दुथडी भरून वाहिले होते. मात्र पुन्हा एकदा वरुणराजाने पाठ फिरवली आहे.
यातच अनेक धरणांमधील पाणीसाठी देखील खालावला आहे. कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी असून, पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरला आहे. कुकडीत यंदा गेल्या वर्षी पेक्षा आठ टक्के कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेती आवर्तनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कुकडी प्रकल्पात १८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. यामध्ये डिंबे धरणात ११ टीएमसी पाणी आहे. डिंबे धरणातील दोन ते अडीच टीएमसी पाणी मिळू शकते.
त्यामुळे यंदा कुकडी लाभक्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे. २ सप्टेंबरअखेर कुकडी प्रकल्पात १८ हजार ६०१ एमसीएफटी (६१ टक्के) पाणीसाठा आहे.
गेल्या वर्षी हा पाणीसाठा २१ हजार ०६३ एमसीएफटी इतका होता. म्हणजे पाणी साठ्यात यंदा ३ एमसीएफटी पाण्याची तूट आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम