छिंदम बंधूंचा अटकपूर्व जामिनावर खंडपीठाने दिला ‘हा’ निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  महापालिकेतील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमचा जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचे गुन्ह्यात औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी दिल्ली गेट येथील टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दाखल केली होती. यापूर्वी घडलेली घटना अशी कि, ९ जुलै रोजी दुपारी दिल्ली गेट येथे छिंदम बंधूंसह त्यांच्या साथीदारांनी बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ केली.

तसेच त्यांच्या ज्युस सेंटरमधील साहित्य फेकून दिले. यावेळी श्रीपाद छिंदम याने टपरीच्या गल्ल्यातील ३० हजार रुपये हिसकावून बोडखे व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत दमदाटी केली.

या घटनेनंतर आरोपींनी बोडखे व त्यांच्या मुलास तेथून हुसकावून देत त्यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकली, असे फिर्यादीत म्हटले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर छिंदम सह चौघांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होते. येथे मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावला.

त्यानंतर चौघांनी खंडपीठात धाव घेतली होती. येथे महेश सब्बन व राजेंद्र जमधाडे यांना अटकपूर्व जामीन मिळाला मात्र श्रीपाद व श्रीकांत छिंदम यांचा अर्ज फेटाळून लावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe