अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अशातच राज्यात लसीकरण मोहिम वेगानं राबवली जात आहे.
त्यातच शनिवारी महाराष्ट्र राज्यानं लसीकरणात रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. राज्यात शनिवारी 11.91 लाख नागरिकांना कोरोनाचे डोस देण्यात आले.
यासह, एका दिवसात लसीकरणाबाबत राज्यात नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यापूर्वी 21 ऑगस्ट रोजी राज्यात एका दिवसात 11.04 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लशीचे डोस देण्यात आले होते.
ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लसीकरणात मुंबईच डंका कोरोना लढाईत जगासमोर ‘मुंबई मॉडेल’चा आदर्श निर्माण करणाऱया मुंबई महानगरपालिकेने आता लसीकरणामध्येही देशात ‘नंबर वन’ ठरण्याचा मान पटकावला आहे.
पालिकेने कोविन अॅपवर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 4 सप्टेंबरपर्यंत 1 कोटी 63 हजार 497 डोस दिले आहेत. यामध्ये 72 लाख 75 हजार 134 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर 27 लाख 88 हजार 363 जणांनी दुसरा डोसही घेतला आहे.
त्यामुळेच मुंबई देशात अव्वल ठरली आहे. लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत राज्य अजूनही अव्वल आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 6.27 कोटी डोस देण्यात आलेत.शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 11,91,921 लस देण्यात आल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम