अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रमुख सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
सागर भांड असे या आरोपीचे नाव आहे. विशेषबाब म्हणजे या आरोपीवर आतापर्यंत तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत.त्याला पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दिलीप देवराम तमनर हे घरी जात असताना त्यांना अनोळखी इसमाने कोयत्याचा धाक दाखवून लूटमार केली होती. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, बॅग आणि मोटार सायकल असा एकूण 30 हजाराचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि आरोपी सागर भांड हा रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे भाड्याने खोली घेवून रहात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने. तिथे जाऊन त्याला अटक केली आहे.
या गुन्ह्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी नितीन मच्छिन्द्र माळी, (वय 22 वर्षे, रा. मोरे चिंचोरे, ता. राहूरी), गणेश रोहीदास माळी, (वय २१ वर्षे, रा. खडकवाडी, मूळा डॅम जवळ, ता. राहूरी), रवि पोपट लोंढे, (वय 22 वर्षे, रा. घोडेगाव, ता. नेवासा),
निलेश संजय शिंदे, (वय 21 वर्षे, रा. अहमदनगर), रमेश संजय शिंदे, (वय- 20 वर्षे, रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी) व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून राहूरी पोलिस स्टेशन येथे हजर केलेले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम