आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर शहरातील एमआयडीसी येथील आयटीपार्कच्या पोलखोलचा दावा करण्याचा दावा करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

यापार्श्वभूमीवर शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन खोटे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांमागे शिवसेना भक्कम असल्याचे स्पष्ट केले.यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आयटी पार्कची काळे यांनी पाहणी करून पोलखोल केल्याचा दावा केला हाेता. याप्रकरणी एका महिलेने काळे यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर काळे यांनी पत्रकार परिषद घेत व्हिडिओ चित्रिकरण तपासण्याची मागणीही त्यांनी केली होती. तर राष्ट्रवादीने काळे यांचा विषय बेदखल असल्याचा टोला लगावला होता.

शहरामध्ये सध्या आयटीपार्कच्या मुद्द्यावर काँग्रेस विरूद्ध राष्टवादी काँग्रेस असा राजकीय कलगीतुरा सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेही उडी घेत काँग्रेसची पाठराखण केली. विशेष म्हणजे या चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार कै. दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी हे देखील उपस्थित होते.

त्यामुळे भविष्यात भाजप, शिवसेना अन् काँग्रेस असे राजकीय समितीकरण पुढे येऊन एकीचे बळ आजमावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, दशरथ शिंदे, संग्राम शेळके आदी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी, आयटीपार्कमध्ये व्हिडिओ शुटिंग केले. तेथे आयटी इंजिनिअर काम करत नाही, पण धुळफेक करण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. त्यानंतर काळे यांच्याविरोधात एमआयडीसीत गुन्हा दाखल करण्यात आला.

खोटे गुन्हे दाखल करणे, शिवसेना सहन करणार नाही. व्हिडिओ चित्रीकरण तपासणी करावी. पोलिस अधीक्षकांशी चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काळे यांच्या पाठिशी शहर शिवसेना भक्कमपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुवेंद्र गांधी यांनी झालेल्या घटनेचा भाजपकडून निषेध व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe