Mula dam : जाणून घ्या मुळा धरणाचा पाणीसाठा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- सोमवारी सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १९ हजार ५०७ दशलक्ष घनफूट तर सायंकाळी ६ वाजता १९ हजार ५३१ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ७५ टक्के भरले आहे.

घाटमाथ्यावर समाधानकारक पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी साठ्याची धिम्या गतीने वाढ होत आहे. सोमवारी दिवसभरात मुळाधरणात अवघी २४ दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली.

सोमवारी सायंकाळी ६ वाजता कोतुळकडुन मुळा धरणात ६३१ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा पाणीसाठा १९ हजार ५०७ दशलक्ष घनफुटापर्यंत आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी सायंकाळी पाणीसाठ्याची २५ हजार ४४४ दशलक्ष घनफूट नोंद होती. कोतुळकडुन १३४५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

सोमवार कोतुळची पावसाची नोंद निरंक असून राहुरी ७ मिलीमीटर, मुळानगर ७ मिलीमीटर, वांबोरी ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणाची पाणीपातळी १७९९.८० फूट झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणाच्या पाणीपातळीची १८११.०५ फूट नोंद झाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe