शहरातील सार्वजनिक उद्याने, शौचालयांचे होतेय जाणीवपूर्वक नुकसान :

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, जिजामाता उद्यानातील काही सिमेंटची बाके,काही खेळण्या, काही संरक्षक भिंती-जाळ्या काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी तोडल्या आहेत.

काहीजण अशा प्रकारे शहराचेच नुकसान करत आहेत, अशी खंत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली आहे. गांधींनगर येथे शौचालयात पायऱ्या-वायरिंग तोडले आहे.

दरवाजे चोरले आहेत. अनेक ठिकाणी “ओपन जिम” उभारता येतील, सुशोभीकरण करता येईल. पण शहरातील काही गुंड-व्यसनी अपप्रवृत्तीमुळे तेही करता येत नाही.

नगरपरिषदेला विकास कामांसाठी निधीची कमतरता असताना असे नुकसान योग्य नाही. सार्वजनिक शौचालये कायमस्वरूपी बंद करायची वेळ येऊ शकते, याची गंभीर नोंद शहरवासीयांनी व सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजसेवकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe