राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचा आदर करणारा पक्ष – महेबुब शेख

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. त्यांना राजकारणात, सत्तेत आदराचे स्थान दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांचा आदर करणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले.

त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. तालुक्यातील वनकुटे, वडगाव सावताळ परिसरातील विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी शेख बोलत होते. आमदार नीलेश लंके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, वनकुट्याचे सरपंच राहुल झावरे,

अण्णा सोंडकर, सोमनाथ वरखडे, दादा शिंदे, बापू शिर्के, सचिन पठारे, विजय औटी, कारभारी पोटघन, डॉ. बाळासाहेब कावरे यावेळी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News