स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची नियुक्ती

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल आमदार निलेश लंके यांनी शिंदे यांचा सत्कार करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन आमदार लंके यांनी दिले.

प्रसाद शिंदे यांनी विना तथा अंशतः अनुदानित, अनुदानीत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या शैक्षणिक समस्यांवर कार्य केले आहे. या प्रश्‍नांची त्यांना जाणीव आहे. विविध शैक्षणिक उपक्रमात ते सहभागी होत असतात. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव शिक्षक बांधवांच्या समस्या सोडविण्याकरिता निश्‍चित होणार असल्याने त्यंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.पी. पाटील यांनी सांगितले.

स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याची भावना प्रसाद शिंदे यांनी व्यक्त केली. तर शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक मदत कक्ष उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

तसेच पेन्शन योजना, शिक्षण सेवक मानधन वाढ, विशेष शिक्षक मानधन वाढ, अशंता अनुदानीत शिक्षकांचे प्रश्‍न, विना अनुदानित शिक्षकांचे असे असंख्य प्रश्‍न सोडवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षकांसह कार्य करणार आहे.

लवकरच तालुका निहाय बैठक घेऊन संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.पी. पाटील, महासचिव ज्ञानेश चव्हाण, नेहाताई गवळी, राहूल खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe