अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी नेवासे पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याने बचतगट प्रकरणात लाच मागितल्याच्या प्रकरणाचा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भांडाफोड केला.
याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन; परंतु, त्यांनी भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई मोठी करुन भाजपमधील काही नेत्यांनी प्रचंड माया गोळा केलेली आहे.
त्यांचीही प्रकरणे उघडकीस आणावी, असे आवाहन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे. नेवाशामध्ये ऑडिबो बॉम्बचा सिलसिला सुरूच असून, येथील पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्याने बचतगटाचे प्रकरण मंजुरीसाठी एक हजार रुपयांची लाच मागितली आहे.
हा गंभीर प्रकार जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. परंतु, त्यांनी ही भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई अशीच सुरू ठेवून भाजपमधील काही नेत्यांनी प्रचंड माया कुठून जमा केली, आलिशान गाड्या-हवेल्या कशा उभ्या केल्या.
याबद्दलही चौकशी करून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणावी. पं. दीनदयाळ उपाध्याय व राष्ट्रीस स्वयंसेवक संघाच्या विचारांवर भाजप कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे निष्कलंक नेते देशाचे सक्षम नेतृत्व करत आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश प्रगती करत असताना वाकचौरे यांनी आता भ्रष्टाचाराविरुद्ध उभे भक्कमपणे रहावे, जिल्हा तुमच्यामागे नक्कीच उभा राहिल अशी ग्वाही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम