अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- आम्ही दिलेले वर्गणीचे पैसे परत कर असे म्हणत एका तरुणास दोघांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना जामखेड तालुक्यातील नान्नज येथे घडली.
याप्रकरणी अमोल मधुकर दळवी या युवकाने दिलेल्या फिर्यादी वरून पप्पू केरबा दळवी व राहुल नारायण दळवी (दोघेही रा. नान्नज ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील गोपाळपुरा येथे संत सेना महाराज मंदिर स्थापनेचे काम सुरू आहे. या कामाची सर्वस्वी जबाबदारी अमोल दळवी यांचेकडे आहे.
या मंदिराचे कामही पूर्णत्वास आले असून मंदिराची उभारणी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी ठरावीक रक्कम गोळा करून मंदिराचे काम पूर्ण करायचे याची सर्व जबाबदारी अमोल दळवी यांच्याकडे देण्यात आली.
सर्व बांधवांनी आप आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पप्पू दळवी व राहुल दळवी यांनी मनात राग धरून,
अमोल यास शिवीगाळ करत ‘तू काय पुढारी झाला काय मंदिराचा सर्व पैशाचा व्यवहार तुझ्याकडे आहे. त्यातील वर्गणीचे काही पैशे आम्हाला दारू पिण्यासाठी दे’ म्हणत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम