जायकवाडी धरण आज 50 टक्के भरणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्र आणि नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवाशात पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणात नव्याने पाणी दाखल होत असल्याने हे धरण आज गुरूवारी 50 टक्के भरणार आहे. जायकवाडी धरणात गतवर्षीचा साठा बर्‍यापैकी शिल्लक असल्याने हे धरण लवकर ओव्हरफ्लो होईल असे वाटत होते.

नगर आणि नाशिक जिल्ह्यातून या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जात असते. पण यंदा जायकवाडीकडे फारसे पाणी गेले नाही. गतवर्षी हे धरण या तारखेला 99 टक्के भरले होते. नाशिकमधूक काही प्रमाणात तसेच शेवगाव, नेवासा तालुक्यात पाऊस झाल्याने हे पाणी जायकवाडीत दाखल होत आहे.

बुधवारी या जलाशयात 16 हजार 325 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. नव्याने पाणी जायकवाडी जलाशयात दाखल होत होते. दरम्यान नेवासा भाग, नागमठाण परिसर त्याच बरोबर लासुर भागातील शिवना नदी दुथडी भरुन वाहत असल्याने हेही पाणी जायकवाडी जलाशयात दाखल होत आहे.

49.61 टक्के साठा जायकवाडीत झाला आहे. पाण्याची आवक पाहता आज गुरूवारी सकाळपर्यंत हे धरण निम्मे भरलेले असेल. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण 95.03 टक्क्यांवर पोहचले. गंगापूर धरण 91.58 टक्क्यांवर स्थिर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe