म्हणून नारायण राणेंच्या पत्नी व मुलाविरोधात लूकआऊट नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट सर्क्युलर नोटीस काढली आहे. या नोटीसमुळे राणे कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहे.

याबाबत वळसे पाटील म्हणाले, यासंर्दभात केंद्र सरकारचे गृह विभागाकडून राज्यसरकारला एक पत्र प्राप्त झाले व सरकारने याेग्य कारवाई करावी असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे गृह विभागाचे वतीने यावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान भाजपने ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपचे आमदार निलेश राणे यांनी आम्ही हायकोर्टात या नोटीसला चॅलेंज करु अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाच महिन्यापूर्वीच आम्ही बँकेला लोन सेंटलमेंट करण्याचे पत्र दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान, ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली.

कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती.

आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होते. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.

याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील ३४ कोटीपर्यंत थकबाकी आहे.

डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe