मोठी बातमी : मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल ! अटकेसाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- तथाकथित महाराज मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनोहर मामांच्या अटकेसाठी करमाळा पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे.

अलीकडेच मनोहर मामा भोसले यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. उंदरगाव येथे मनोहर मामा भोसले यांचा बाळूमामा यांच्या नावाने महत्व मंदिर आहे.

या मठांमध्ये अनेक भाविक येतात या भाविकांकडून बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला होता. त्यानंतर आता आलेल्या वृत्तानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे.

यानंतर आता मनोहर मामा भोसले याच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा‌ दाखल केला आहे. यानंतर आता मनोहर मामा भोसले यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना झाले आहेत.

कर्करोग बरा करतो असे सांगत लोकांची केली फसवणूक !

संत बाळूमांमाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली.

याप्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच

औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले…

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत.

त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत.

तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News