अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- महाविकास आघाडीने आजवर वेळोवेळी केलेल्या मागणीच्या आधारे शासनाने चौकशी केली. चौकशीमध्ये अनेक ठिकाणी करोडो रुपयांची अनियमितता आढळून आलेली आहे.
चौकशीसाठी समितीला बाजार समितीने अपूर्ण कागदपत्रे दिली, मासिक सभांना हजर नसताना प्रवास भत्ता घेतला गेला. अनधिकृत बांधकामे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांसह अनेक मुद्यांमध्ये घोटाळे झाल्याचे चौकशी समितीला आढळून आले आहे.
बाजार समिती आर्थिक डबघाईला आलेली आहे. सर्व रकमा या वसुलीस पात्र आहेत. दूध संघाचे वाटोळे केले तसे बाजार समितीचे होऊ नये म्हणून शेतकरी हितासाठी आम्ही हे सगळे करत आहोत. अशी टीका जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली.
गोविंद मोकाटे म्हणाले की, बाजार समितीत ५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला असून, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे चक्र यांचे सुरू आहे. संचालक मंडळ लवकरच जेलमध्ये जाईल.
बाळासाहेब हराळ म्हणाले पाच वर्षाचे स्पेशल ऑडीट शासनाने करावे म्हणजे अनेक गंभीर प्रकार समोर येतील .बाजार समितीने चौकशी समितीला कागदपत्रे पण उपलब्ध करून दिली नाहीत.
ती का दिली नाहीत याचे संशोधन होने गरजेचे असल्याचे सांगितले. स्पेशल ऑडीटची मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कथित गैरव्यवहारा बाबत महाविकास आघाडीने पणन संचालकांकडे दाद मागितली होती.
त्यावर एस. डी. सूर्यवंशी आणि गणेश पुरी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून नगर बाजार समितीला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून ८ सप्टेंबर ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
त्यावर नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत बाजार समितीला मिळालेल्या कारणे दाखवा नोटीस वरून बाजार समितीत मोठे आर्थिक घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम