अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा किल्यावर उभारण्यात येणाऱ्या स्वराज्य ध्वज यात्रेचा आज कर्जतमधून शुभारंभ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अलोट गर्दी लोटली होती. यावरून राम शिंदे यांनी रोहित पवारांना लक्ष केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सातत्याने विरोधी पक्षांसह राजकीय पक्षांना गर्दीचे राजकीय कार्यक्रम न करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र कर्जत जामखेडचे आमदार मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. तसेच आजोबाचेही ऐकत नाही.
अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. विद्यमान आमदारांनी बेजबाबदारपणा दाखवत गर्दी जमवली. नियम धाब्यावर बसवले. सदर कार्यक्रमात गर्दी जमवल्या प्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले कोणाच्याही मनामध्ये, ध्यानामध्ये नव्हतं की उजनीवरून जामखेड शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो परंतु मी इच्छाशक्ती दाखवली. एवढ्या मोठ्या पाणीपुरवठा योजनेचा आपण जवळपास दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करीत होतो त्याला सरकारने तत्वत: मान्यता दिली होती.
पण गेली २४ महिने ही योजना सुरू झाली नाही. श्रेय घेण्यासाठी ती रखडवली गेली. जर ही योजना वेळेत झाली असती असतील जामखेडचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता. पाणीयोजनेचे सुरुवात कधी झाली ? कोणी केली कोणाच्या काळात झाली ? कोणते नगरसेवक होते? कोण नगराध्यक्ष होते?
कोणी एक टक्का रक्कम भरली ? कोणी पाठपुरावा केला? हे जनतेला माहित आहे. पण विद्यमान आमदार श्रेय घेण्यासाठी करत असलेला प्रयत्न केविलवाणा आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम