मंत्री गडाख म्हणाले…जलसंधारणाची उत्कृष्ट कामे करून गावातील पाणी टंचाई दुर करणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  जामखेड तालुक्यांमधील गावातील पाण्याची टंचाई लक्षात घेता गावातच जलसंधारणची दर्जेदार कामे करून पाण्याची टंचाई दुर करू असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी केले आहे. जामखेड तालुक्यातील बावी गावात कवादे वस्ती येथे शिवसंवाद बैठक पार पडली यावेळी नामदार शंकरराव गडाख बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, गावात पाणी अडवा पाणी जिरवा तसेच तलाव खोलीकरण व सिमेंट बंधारे अशी जलसंधारणाची दर्जेदार कामे करून पाणी टंचाई दुर करू म्हणजे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. बावी गावच्या पाण्याची टंचाई पाहता गावातील दोन्ही तलावाचे खोलीकरण रुंदीकरण करून दुरूस्ती करावी तसेच काही सिमेंट बंधारे बांधले जावेत अशा प्रकारे मागणीचे निवेदन सरपंच निलेश पवार यांनी नामदार गडाख यांना दिले.

याविषयी बोलताना गडाख यांनी सांगितले की, गावातील पाण्याची गरज गावातच जलसंधारण कामे दर्जेदारपणे करून सोडवणे आवश्यक आहे त्यामुळे गावात पाणी अडवा पाणी जिरवा तलाव खोलीकरण व सिमेंट बंधारे तसेच समतल चर याद्वारे गावातच भुगर्भातील पाणी साठा वाढवला जाईल व गावाची पाण्याची गरज गावातच पुर्ण होईल असेही गडाख यांनी सांगितले

या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तालुकाप्रमुख संजय काशिद, सरपंच निलेश पवार, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, बाळासाहेब पवार, उपसरपंच दादा मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य राहुल कवादे,

राम पवार, महादेव कारंडे, माजी सरपंच शहाजी कवादे, सोसायटी चेअरमन दादासाहेब पवार, ग्रामसेवक फरताडे भाऊसाहेब माजी सरपंच सुनील चिकने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe