file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-   जिल्ह्यातील उक्कडगावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण व अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सरपंच महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नेमके प्रकरण काय? जाणून घेऊ सविस्तर राणी काथोरे या उक्कडगावच्या सरपंच आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिला. गावात ग्रामसभा चालू असताना मी तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडला.

विरोधी पार्टीला ही निवड मान्य नव्हती. त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर भाजपच्या गुंडांनी मला पाठीमागून लाथ मारली, असा आरोप राणी कथोरे यांनी केला आहे.

रुपाली चाकणकर यांचे ट्विट उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

मी स्वत: नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा, असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.