अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव येथे भरवस्तीत व धार्मिक स्थळाजवळ खुलेआम दारूविक्री सुरु आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमधून याविषयी संताप व्यक्त केला जातो आहे.
हि दारूची दुकान तात्काळ बंद करावी. यासाठी सरपंच – उपसरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीच याबाबतचा जाहीर ठराव घेतला. त्याच्या लेखी प्रती पाथर्डी पोलिसांना दिली आहे.
दरम्यान याप्रकरणी आता पोलीस दल काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्रांताधिकारी कार्यालयाच्या मागे हात्राळ पाडळी येथे जाण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे.
जवळच एक धार्मिक स्थळही आहे. भरवस्तीत दारूविक्री केली जाते. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनीही याच रस्त्याने शाळेत जातात. काही तळीराम नशेत असताना अश्लील वर्तन करतात.
त्यामुळे भरवस्तीतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. तेथील रहिवाशांनी वेळोवेळी याबाबतची समज दिली. परंतु, सार्वत्रिक जाच सुरूच आहे. आता तर तक्रारी केल्याने दमबाजी व बघून घेण्याची भाषा सुरू झाली आहे.
त्यामुळे ग्रामस्थांच्या भावनांचा वेळीच विचार केला जावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी थेट कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम