अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-नागवडे कारखान्याचे नाव जिल्हा सह राज्यातील सहकारात आगळे वेगळे असून, या कारखान्याचे सर्व निर्णय हे सर्व संचालकांना विचारात घेऊनच घेतले जातात.
सर्व निर्णया मागे सभासद तसेच कारखान्याचे हित लक्षात घेतले जाते. विरोधकांनी आरोप केलेली सर्व विधाने हे निराधार असून त्यांनी सांगितल्या प्रमाणे जर कराड येथील साखर कारखाना माझ्या मालकीचा असल्याचे सिद्ध केल्यास, मी नागवडे कारखान्याच्या चेअरमन पदाचा तत्काळ राजीनामा देईल.
असे जाहीर आव्हान नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केले. श्रीगोंदा कारखानावरील गेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नागवडे यांनी सांगितले की, सहकारात काम करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. काम करताना येणाऱ्या अडचणी ज्याचे त्यालाच माहीत असतात.
मगर हे कारखान्याच्या उपाध्यक्ष पदावर असताना त्यांनी कारखान्यासाठी एक तास देखील वेळ दिला नाही ते स्वर्गीय बापूंच्या कारखान्याची चुकीची माहिती देत कोणत्याही गोष्टीचे भांडवल करून नाहक बदनामी करतात .शेतकऱ्याची कामधेनू असलेल्या नागवडे कारखान्याचे तसेच सभासदाचे हित जोपासून कारखान्याची बदनामी करू नये.
शहनिशा करून मग आरोप करावेत. संचालक मंडळाच्या कोणत्याही बैठकीत मगर व अण्णासाहेब शेलार यांच्याशी कारखान्यात तसेच कारखान्याच्या बाहेर देखील कोणताही वाद झाला नसून आमचे त्यांच्याशी कोणतेही वितुष्ठ नाही. नागवडे सहकारी कारखान्यात बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन संचालक मंडळात सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.
कारखान्याची परिस्थिती उत्तम स्थितीत आहे. मागील गळीत हंगामात उसाअभावी कारखाना बंद ठेवल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
मात्र या गळीत हंगामात कारखान्याने हे नुकसान भरून काढत कारखाना या वर्षी सुमारे ७४ लाख रुपये नफ्यात आला आहे. चालु वर्षी झालेल्या लेखा परीक्षण अहवालात कारखान्याने :अ’ दर्जा प्राप्त केल्याचे नागवडे यांनी यावेळी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम