अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील ‘मिडसांगवी ग्रामपंचायत अंतर्गत भवरवाडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.आठ दिवसांत १८ जण ‘कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मध्यंतरी खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरामध्ये कोरोनाची रु्णसंख्या कमी झाली होती मात्र आता पुन्हा कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. वृषाली दराडे, डॉ. मोनिका आघाव यांनी भवरवाडी येथे येऊन पाहणी केली, प्रत्येक नागरिकाने ‘कोरोना तपासणी करून घ्यावी,
डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. नागरिकांनी त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात असणाऱ्या सर्व गावातील ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 3९ असून, त्यापैकी १८ रुग्ण हे एकट्या भवरवाडी येथील आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम