त्या दोन राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार?; संजय राऊत म्हणाले की…

Ahmednagarlive24 office
Published:
Sanjay Raut Press Conference Live 

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढवणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरू आहे, तसा आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत.असं खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. गोव्यामध्ये साधारणतः 20 जागा लढविण्याचा आमचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.

संजय राऊत चंद्रकांत पाटलांच्या कालच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांत पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील. तर ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात.

तर त्यानी तो आनंद घ्यावा पण वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील ३ वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे. असंही राऊत म्हणाले.

दरम्यान गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणे हा त्या राज्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर इतरांनी भाष्य करण्याची गरज आहे . गुजरात राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती तितकीशी बरी नाही.

परंतु, उत्तर प्रदेश मध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितले जात आहे. तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत. त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. असं राऊत यांनी म्हटलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe