महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्यांच्या अडचणीत वाढ !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिलेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी अनिल परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई हणार असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. लोकायुक्तांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याचे आदेश दिले आहेत.

लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब याच्या कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. तसेच गांधी जयंतीच्या दिवशी परब यांच्या कार्यालयावर कारवाई सुरु केली जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

वांद्रे येथील परब यांचे कार्यालय अनधिकृत असून त्यासंदर्भात लोकायुक्तांनीच बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याचं सोमय्या म्हणालेत. सरकारमधील परिवहन मंत्री आणि ऊद्धव ठाकरे यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट तोडल्या नंतर

आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा अनिल परब यांच्या बांद्रातील ऑफिसकडे वळवलाय. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 ऑक्टोबरला म्हाडाकडून कारवाई होणार असल्याचा दावा केलाय. ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली, त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा ऊद्देश आहे.

एखादा निकाल कुठलातरी आला की काही मंत्र्यांना असं वाटतं की चार दिन की चांदनी, करू द्या त्याला पाच पंधरा दिवस शेरो शायरी करू द्या. ज्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने तुरुंगात डांबलं ती केस ते प्रकरण अजूनही सुरूच आहे. छगन भुजबळ या मंत्रिमहोदयांना एवढेच सांगायचे की उड्या नका मारू 120 कोटी रुपये रोख मधून दिले गेले आहेत,

महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे नव्हते तर कुठल्या नवनाथ घोटाळाचे होते का ते सांगा ? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते आणि आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे.

मी म्हणालो ना चार दिन की चांदनी तिचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या, गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते करत असतील, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe