अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- दोन कंटेनरांच्या समोरासमोरील धडकेत एक कंटेनर चालक जबर जखमी झाल्याची घटना नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दहिगाव चौफली येथे घडली आहे.
रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कंटेनर क्रमांक (सी जी ०७सी ए ५५४४) हा कोपरगावहून औरंगाबादकडे बांधकाम साहित्य घेऊन चालला होता.तर दुसरा कंटेनर (एम एच ४८ए वाय१६०२) हा रिकामा चालला होता.
ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला अपघात !
दहिगाव चौफलीच्या पुढे अगदी थोड्याच अंतरावर कोपरगावकडे जाणाऱ्या कंटेनरने आपल्या पुढे जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की कोपरगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या कँबीनचे तोंड विरूद्ध झालेले होते.
जखमीस ग्रामीण रूग्णालय येथे हलविले…
जखमी कंटनेर चालक यास १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीकेने ग्रामीण रूग्णालय येथे हलवण्यात आले आहे. तर दुसरा कंटेनर चालकास किरकोळ दुखापत झाली आहे.
दोन्ही बाजूला वाहानांच्या रांगा
दहिगावचे प्रभारी पोलीस पाटील गणेश खिलारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर लोटण्याचा प्रयत्न करून ट्रँफीक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळ ट्रँफीक बंद असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहानांच्या रांगा लागल्या होत्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम