हमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील रेल्वे मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा चालू आलेला डाव साध्य होऊन देणार नाही. जर हा मालधक्का स्थलांतरित झाला तर 600 माथाडी नोंदणीकृत कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, यास जबाबदार कोण? नगर रेल्वे स्टेशन वरील मालधक्का सर्वांसाठी सोयीचा आहे.
असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. रेल्वे स्टेशनवरील हमाल माथाडी कामगारांसोबत आ. संग्राम जगताप संवाद साधला. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रशांत गायकवाड, प्रा. माणिकराव विधाते, सुमतीलाल कोठारी तसेच माथाडी कामगार व प्रतिनिधी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे व चुकीच्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकार्यांची दिशाभूल चालू आहे. जि.प. कृषी अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे वाहतूकदारांशी संगनमत करून रेल्वे माल धक्का इतर स्थलांतरित करण्याचा डाव केला आहे.
यामुळे 600 माथाडी कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकार्यांनी चुकीचे काम करू नये, अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी माथाडी कामगारांना समवेत संवाद साधतांना दिला. हा मालधक्का स्थलांतरित होऊन देणार नाही.
तसेच सदर कामगारांचा प्रश्न मार्गी न लागल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्व जबाबदारी कृषी विकास अधिकारी व प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम