अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नारायण राणे हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी पोहचले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबाग इथल्या एलसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत.
त्यासाठी एलसीबी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राणे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून पावणेबाराच्या सुमारास ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत.
दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब आजच नोंदवून घेतला जाणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागेत पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरीसाठी येणार आहेत.
या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर महाड न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अलिबाग इथल्या एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) समोर हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते.
गेल्या तारखेला राणे स्वतः हजर न राहता वकील पाठवला होता. यावेळी राणे स्वतः हजर राहणार आहेत. नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर आज पहिल्यांदाच पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत. त्यामुळे अलिबागमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम