बिग ब्रेकिंग : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर अहमदनगर जिल्ह्यातून अखेर बदली झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातुन जळगाव जिल्ह्यात ज्योती देवरे यांची नियुक्ती झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव ला संजय गांधी निराधार योजनेत बदली झाली आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या वर शासकीय शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.महिला म्हणून आमदार, प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक,

गटविकास अधिकारी यांच्या कडून त्रास होत असल्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा महिला चौकशी समिती, विभागीय आयुक्त यांच्या समितीचा अहवाल आला आहे.

मागील महिन्यात तहसीलदार देवरे यांच्या आँडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली होती,पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला होता.यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर होता.

आपल्या विरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणं, अँट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याने देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले होते.

आपल्या मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्याचा विचार कधीकधी येतो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचल्याचे देवरे यांनी म्हटलं होते.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बाजूने उभे राहण्यावरून महसूल कर्मचाऱ्यांत फूट पडली होती. देवरे यांच्यावरील अन्यायाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते,

देवरे यांची बदली करा किंवा आमची तरी तालुक्याबाहेर बदली करण्याची विनंती करत बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe