अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सोमवारी सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये मोरेना येथील नंदिनी अग्रवाल देशात पहिली आली आहे.
तर इंदूरची साक्षी अरियन आणि बंगरुळूची साक्षी बगरेचा ही तिसरी आली आहे. जुन्या व नव्या सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली होती.

जुन्या अभ्यासक्रमात मंगळुरू येथील रूथ डिसिल्व्हा प्रथम तर पालाकाड येथील मालविका कृष्णन दुसरी आली आहे. जुन्या अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी तर नवीन अभ्यासक्रमासाठी ८२ हजार ८३९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
नवीन अभ्यासक्रमाला दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या २३ हजार ९८१ विद्यार्थ्यांपैकी अवघे ११.९७ टक्के म्हणजे दोन हजार ८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
याशिवाय ९ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी पहिला ग्रुप तर ७ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी दुसरा ग्रुप उत्तीर्ण केला आहे. याचबरोबर सोमवारी फाउंडेशन अभ्यासक्रमाचाही निकाल जाहीर झाला आहे.
या अभ्यासक्रमाची परीक्षा ७१ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी २६.६२ म्हणजे १९ हजार १५८ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम