कोरोना नैसर्गिक आपत्ती काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफीसाठी सहाय्याची मोहीम

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- आहे तर मग सामान्य नागरिकांची का नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम सामान्यांवर झाला आहे.

आजही त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. याचा विचार करता सामान्यांची घरपट्टी माफी केली तर त्यांना मोठा आधार मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

याच अनुषंगाने नगर शहर विकास समितीने कोरोना नैसर्गिक आपत्ती काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, या मागणीसाठी सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

महापालिकेच्या १२ ऑगस्ट रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत तीनपट घरपट्टी वाढीचा विषय खर्चासह मंजुरीसाठी ठेवला होता. शहर विकास समितीने तीनपट घरपट्टी वाढीविरोधात आंदोलन केेले होते.

नागरिकांच्या कलम १३३-अ या हक्कासाठी मनपा पदाधिकारी आणि नगरसेवकांना मागणीपत्र दिले जात आहेत. शहर विकास समितीबरोबरच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, चितळेरोड हॉकर्स युनियन, सिटू, ऑल इंडिया युथ फेडरेशन,

पीस फौंडेशन, ऊर्जिता सोशल फौंडेशन, रहेमत सुलतान फौंडेशन, आयटक, आम आदमी पार्टी, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन, छावा, शिवराष्ट्र सेना या समविचारी पक्ष, संघटनांनी महापौरांना मागणीपत्र दिले आहेत. शहरात याबाबत विविध माध्यमांमधून जनजागृती केली जात आहे.

विविध भागात कायद्याच्या माहितीची पत्रके वाटणे, नागरिकांच्या प्रभाग बैठका घेऊन कायद्याचा प्रसार व हक्काचे प्रबोधन करणे, आदी मोहीम सुरू आहे.

दरम्यान लॉकडाऊनमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेतून स्वतःला सावरत असताना पुन्हा हा आर्थिक भुर्दंड सध्या तरी नको अशीच जनभावना निर्माण झाली आहे.सामान्य नागरिकांच्या संकटाचा विचार करता त्यांची घरपट्टी माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe