अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील नागरिकांना ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने ऐन पावसाळ्यात ते तहानलेले आहे. जलसंपदा विभागाची भेंडाळी परिसरातील जमीन हस्तांतरित करावी.
पाटबंधारे विभागाने निधी उपलब्ध करुन साठवण बंधारा करावा, असे साकडे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घुलेवाडीकरांनी घातले आहे. घुलेवाडी गावाला अनेक समस्यांनी वेढले आहे.
पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी हे महत्वाचे प्रश्न भेडसावत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन साफ दुर्लक्ष करत आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षानुवर्षे सुटत नसल्याने एकता चौक, मालदाड रोड, बालाजीनगर, मालपाणी नगर, तिरंगा चौक,
१३२ केव्ही या भागातील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालावे, अशी मागणी घुलेवाडीकरांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम