हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी आरपीआयचे उपोषण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- शहरातील जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवती स्थानिक नागरिकाने केलेले अतिक्रमण हटवून, सुरु असलेली दर्गाची विटंबना त्वरीत थांबण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.

या उपोषणात आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर कार्याध्यक्ष आजीम खान, संतोष पाडळे, जाहिद सय्यद,

अजीम खान, अरबाज शेख, दिनेश पाडळे, फिरोज पठाण, लतिफ खान, विकी प्रभळकर, जाहिद शेख आदी उपस्थित होते. या उपोषणास समाजवादी पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन दक्षिण जिल्हाध्यक्ष अझीम राजे, सचिव जहीर सय्यद उपोषणात सहभागी झाले होते.

जुना मंगळवार बाजार येथे सुमारे दोनशे वर्षा पूर्वीची हुसेन शाहवली बाबा यांची दर्गा आहे. सदर दरगेवर हिंदू-मुस्लिम समाजाची श्रध्दा आहे. सर्व समाजातील नागरिक दर्शन घेण्यासाठी दर्गावर येतात.

परंतु ही दर्गा शहराच्या मध्यवस्तीत असल्याने दर्गे भोवती गायकवाड परिवाराने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे दर्गेवर दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांना जागा शिल्लक राहिलेली नाही. दर्गेला खेटून दोर्‍या बांधल्या असून, त्यावर दररोज महिला व पुरुषांचे कपडे वाळण्यासाठी टाकले जात आहे.

याप्रकारामुळे दर्गाची एकप्रकारे विटंबना होत असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. दररोज दर्गेला खेटून वस्त्रे वाळण्यासाठी टाकली जात आहे. अतिक्रमण करणार्‍या गायकवाड कुटुंबीयांच्या घराला दोन दरवाजे असून, मुद्दामहून दर्गेलगत असलेला दरवाजा वापर केला जात आहे.

यामुळे बाबांवर श्रध्दा असलेल्या भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. अशा प्रकरणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून,

जुना मंगळवार बाजार येथे असलेल्या हुसेन शाहवली बाबा दर्गा भोवती स्थानिक नागरिकाने केलेले अतिक्रमण हटवावे व कपडे वाळण्याचा प्रकार त्वरीत बंद करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe