परिवहनमंत्र्यांनी भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला दिला इशारा; म्हणाले 72 तासात माफी मागा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या आरोप – प्रत्यारोप प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आहे. सोमय्या यांनी सध्या महविकास आघाडी सरकारच्या नेतेमंडळीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे आता ते अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी जे काही आरोप केले आहे.

त्या आरोपांचं पुरव्यासह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा 72 तासात माफी मागावी नाहीतर किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, अशी नोटीसच अनिल परब यांच्या वकिलांनी सोमय्या यांना पाठवली आहे. अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नते आणि मंत्री आहेत.

मात्र किरीट सोमय्या यांच्या निराधार आरोपांमुळे प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे. तसेच नोटीशीत काही ट्वीटचा तारखेसह उल्लेख करण्यात आला आहे.

त्यामुळे सोमय्या यांनी सर्व ट्विट डिलीट करून माफी मागावी अन्यथा आपण 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे अनिल परब यांनी नोटीसीत म्हंटल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News