अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील डिग्रस येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटात गज, लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली. या बाबत परस्पर विरोधात दोन्ही तब्बल १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
सुलभा दिपक कदम राहणार डिग्रस यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १२ सप्टेंबर रोजी साडे अकरा वाजे दरम्यान ही घटना घडली. यातील फिर्यादी हे आरोपीचे घरासमोरील रोडचा वापर करतात.
या कारणावरून आरोपी यांनी गैर कायद्याची मंडळी एकत्र जमवून सुलभा कदम यांच्या राहते घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून त्यांना घराच्या बाहेर ओढले.
त्यांना व त्यांचे पती यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. त्यांचे घरावर दगडफेक केली. तसेच घरातील सामानाची नासधूस केली.
सुलभा दिपक कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी 1) सुजाता बाळासाहेब भडकवाड 2) बाळासाहेब मनाजी भडकवाड 3) सावित्रीबाई लक्ष्मण नन्नवरे राहणार डिग्रस, तालुका राहुरी.
4) अनिता अशोक ससाने 5) अशोक मोहन ससाने दोघे राहणार वांबोरी 6) सुनिता विकास बोरडे राहणार कोल्हार 7) सुमन धोंडीराम नन्नवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा तपास हवालदार अण्णासाहेब चव्हाण हे करीत आहेत.
सुजाता बाळू भडकवाड राहणार डिग्रस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १२ सप्टेंबर रोजी साडेदहा वाजे दरम्यान ही घटना घडली.
सुजाता भडकवाड ह्या आरोपीचे घरासमोरील रोडचा वापर करतात. या कारणावरून आरोपी यांनी गैर कायद्याची मंडळी एकत्र जमवून सुजाता भडकवाड यांच्या राहत्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून त्यांना घराच्या बाहेर ओढून काढले.
त्यांना व त्यांचे पती यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
सुजाता भडकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी 1) रविंद्र रघुनाथ डांबर 2) माया रवींद्र डांबर 3) स्वप्नाली सातपुते 4) सुलभा दिपक कदम 5) सिंधू डांबर 6) नंदा रघुनाथ डांबर सर्व राहणार डिग्रस, तालुका राहुरी 7) नितीन रतन जोगदंड 8) ताराबाई रतन जोगदंड दोघे राहणार जोगदंड वाडी तालुका श्रीरामपूर.
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास हवालदार संजय जाधव हे करीत आहेत. रस्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील तब्बल १५ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम