अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- देशासह राज्यातील काही भागांत कोरोनाचा विषाणूचा हैदोस अद्यापही कायम आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जवळपास 20 हजारांहून अधिक लसीकरण केलेल्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत झालेल्या एकूण लसीकरणापैकी 0.35% लोकांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली आहे. यामधील वृद्धांचं प्रमाण चिंतेत भर टाकणारं आहे. दोन्ही डोस घेतलेल्या एक लाख नागरिकांपैकी 350 लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे.
दोन्ही डोस झाल्यानंतरही कोरोना होण्याची भीती सर्वत्र केली जात आहे, परंतु याचं प्रमाण खूप कमी आहे, असं मुंबई पालिकेच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. नागरिकांनी लसीबाबत भीती बाळगू नये.
अहवाल तयार करते वेळी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 25.39 लाख होती. यापैकी 9001 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे झालं.
६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, ही चिंता वाढवणारी आकडेवारी आहे.
पहिला डोस घेऊन सुद्धा 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना कोरोनाची पुन्हा एकदा लागण झाली आहे. पहिला डोस घेऊन 4420 जणांना कोरोनाची लागण झाली. तर दुसरा डोस घेऊन 1835 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम