सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे छापे ! पहा किती आहे त्याची संपत्ती ?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- गरिबांसाठी देवदूत बनलेल्या सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने छापे मारले आहेत. आयकर विभागाने एकूण ६ ठिकाणी छापे टाकले आहेत.

दरम्यान, आयकर विभागाने आज बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराचे ‘सर्वेक्षण’ केले. आयकर विभागाची टीम सकाळी सोनू सूदच्या घरी पोहोचली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणांचे सर्वेक्षण केले. मात्र, कोणतीही कागदपत्रे जप्त केलेली नाहीत.

आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 133A च्या तरतुदींनुसार चालवल्या जाणाऱ्या ‘सर्वेक्षण (खात्यांचे निरीक्षण) मोहिमेत, प्राप्तिकर अधिकारी केवळ व्यावसायिक परिसर आणि जोडलेल्या जागेत निरीक्षण करतात. तथापि, अधिकारी कागदपत्रे जप्त करू शकतात.

सोनू सूदकडे एकूण १३० कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या २ दशकांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात २६०० चौरस फुटांच्या ४ बीएचके फ्लॅटमध्ये सोनू सूद राहतो. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. सोनू सूद उत्तम अभिनेता असण्यासोबत उत्तम बिझनेसमनही आहे.

जुहूमध्ये सोनू सूदचे हॉटेल आहे. याशिवाय अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच एक निर्माता म्हणूनही त्याची ओळख आहे. मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार असून किंमत ६६ लाख रुपये आहे.

याव्यतिरिक्त ऑडी क्यू ७ या गाडीची किंमत जवळपास ८० लाख रुपये इतकी आहे. पोर्शची पनामा कार ज्याची किंमत २ कोटी आहे दरम्यान अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आज सोनू सूद संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे. प्रत्येकजण जो त्याच्या घरी मदत मागण्यासाठी येतो, सोनू सूद त्याला मदत करतो. आज अशी अनेक सरकारं आहेत, जी काही करू शकत नाहीत, ते सोनू सूद करतो आहेत.

आम्ही दिल्ली सरकारद्वारा काही खास उपक्रमांबद्दल सोनू सूदशी बोललो आहोत. यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीत प्रचाराबाबतच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. केजरीवाल पुढं म्हणाले की, दिल्लीमध्ये आम्ही ‘देश के मेंटर’ कार्यक्रम सुरू करणार आहोत. सोनू सूद देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe