अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- कोरोना प्रतिकूलता कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण,वर्क फ्रॉम होम तसेच ऑनलाइन उपकरणांचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले.
याच ऑनलाईन जीवन पद्धतीला पुढे नेणाऱ्या सुमारे 500 पेक्षा जास्त गॅजेट्स तथा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कलात्मक सजावटीतून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित तंत्रस्नेही शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागूल यांनी “आयसीटी गणेशा”ची निर्मिती केली
असून याचे ऑनलाइन उद्घाटन नामदार मा. वर्षाताई गायकवाड (मा.शालेय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त ऑनलाइन युगाच्या उपकरणांना मानवंदना म्हणून तसेच डिजिटल साक्षरता वाढावी म्हणून १५ बाय १० फुटांच्या गणेशाच्या भव्य आकारामध्ये डॉ.बागुल यांनी मोबाईल,
टॅब,लॅपटॉप,संगणक,रेडिओ यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांबरोबरच सेल्फी स्टिक,सीडी प्लेयर सीडी व डिव्हीडी,ट्रायपॉड,आयपॉड,गूगल होम,डिजिटल घड्याळ,इलेक्ट्रॉनिक पेन व रायटिंग ई- स्लेट,पेन ड्राईव्ह, व्हॉल्गींग लाईट बार,मोबाईल स्टॅन्ड,शंभरपेक्षा अधिक विविध केबल्स,
ब्लूटूथ स्पीकर,व्हिडिओ गेम व ड्रायव्हर,ऑडिओ प्लेयर व कॅसेट्स,वायफाय डोंगल,अबॅकस स्लेट,व्ही.आर.बॉक्स,ड्रोन,कॅमेरा व लेन्स,कराओके माईक,प्रिंटर स्कॅनर,पॉवर बँक व चार्जर,सिम कार्ड,मेमरी कार्ड व कनेक्टर्स,
डिश टीव्ही,विविध देशातील शैक्षणिक आयसीटी खेळणी यासारख्या सुमारे 500 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करून आयसीटी गणेशाची प्रतिकृती तयार केली. ऑनलाइन गणेशोत्सव असल्याने अमोल बागूल या नावाच्या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल वर या उपक्रमाचा व्हिडिओ सर्वांना पाहावयास उपलब्ध होणार आहे.
डॉ. बागुल यांनी “आयसीटी गणेशा आरती”चे देखील लेखन केले आहे.प्रसाद म्हणून गणेशभक्तांना डॉ.बागुल लिखित “माय आयसीटी गाईड” हे कॉफीटेबल बुक दिले जाते. आय सी टी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी होय.
कोरोना प्रतिकूलता कालावधीतील सुमारे दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू राहावे म्हणून विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तथा उपकरणे डॉ. बागुल यांनी गरजेनुसार विकत घेतलीतसेच विविध देशातील शिक्षक मित्रांकडून उपलब्ध देखील केली.
डॉ.बागूल यांना या उपक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री-उदय सामंत,राज्यमंत्री ओम प्रकाश कडू,शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी,शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे,
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील,शिक्षणाधिकारी (माध्य.)अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथ) शिवाजी शिंदे,मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार,समन्वयक अरुण पालवे,श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,
शालेय समिती चेअरमन ॲड.किशोर देशपांडेआदी मान्यवरांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या आहेत. अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल यांच्याशी +91 9595 54 5555 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम