मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार बाचकर कार्याध्यक्ष, सावंत सरचिटणीस,इरोळे कोषाध्यक्ष

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार यांची तर कार्याध्यक्ष म्हणून खंडू बाचकर, सरचिटणीस म्हणून विलास सावंत व कोषाध्यक्ष म्हणून बाबा इरोळे यांची निवड करण्यात आली.

राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागाचे सरचिटणीस सत्यवान मेहरे यांच्या निरीक्षणाखाली, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, शिक्षक बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण,

संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, बाळासाहेब सरोदे, महिला आघाडीच्या राज्य प्रतिनिधी विद्युल्लता आढाव, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, उच्चाधिकारचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे, कला साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष कारभारी बाबर,

न.पा. संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली मुळे, संदीप मोटे, राजेंद्र सदगीर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महामंडळ सभेत ही निवड करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला त्यानंतर सर्वानुमते मुख्याध्यापक संघाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती पुढील प्रमाणे- जिल्हाध्यक्ष – रामचंद्र गजभार (नेवासा),

कार्याध्यक्ष – खंडू बाचकर (राहुरी), सरचिटणीस – विलास सावंत (अकोले), कोषाध्यक्ष – बाबाजी इरोळे (कोपरगाव), कार्यालयीन चिटणीस – संभाजी आढाव (नेवासा), उपाध्यक्ष – राजू तुकाराम थोरात (श्रीरामपूर),

श्रीमती राजश्री डोंगरे (कोपरगाव), शांताराम कचरे (संगमनेर), सहचिटणीस – राजेंद्र ठुबे (पारनेर), भाऊसाहेब काळे (श्रीगोंदा), हिराबाई देशमुख (पारनेर), युनूस सय्यद (कोपरगाव),

सल्लागार- सखाराम सातपुते (शेवगाव). यावेळी बोलताना सर्वच वक्त्यांनी जिल्ह्यामध्ये शिक्षक संघ बळकट करण्याचा निश्चय व्यक्त केला. सूत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी केले तर शेवटी जिल्हा संघाचे सरचिटणीस मनोज कुमार सोनवणे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe