अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील गणेशनगर फाटा येथे पैसै न दिल्याचे कारणावरुन रस्त्याने जाणा-या प्रवाशाची हत्या करणारे चार तृतियपंथी आरोपी त्यांचे चार साथीदारासह १२ तासांचे आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार, (वय २६, रा. सुभाष कॉलनी, वार्ड नं. ६, श्रीरामपूर) , विकास दशरथ धनवडे उर्फ रुपाली सलोनी शेख (वय २५), आनंद फौजी शेलार उर्फ रुचीरा सलोनी शेख (वय २०), लक्ष्मण शंकर वायकर उर्फ लक्ष्मी सलोनी शेख ( वय २०, रा. इंदीरानगर, कोपरगाव),
अभिजीत उर्फ गोट्या बाळू पवार (वय २३, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर), गौरव उर्फ सनि भागवत पवार (वय १९, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर), राहूल उत्तम सोनकांबळे (वय २२, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर), अरबाज सत्तार शेख ( वय १९, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) या सर्वांना खंडाळा, श्रीरामपूर, नायगाव, कोल्हार अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. इरफान रज्जाक शेख (रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर)
याचा पोलीसांनी शोध घेतला. पंरतु तो मिळून आला नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सोपान गोरे, सफौ मन्सूर सय्यद, पोहेकाॅ भाऊसाहेब काळे, विजयकुमार बेठेकर, मनोहर गोसावी,
पोना शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवि सोनटक्के, संतोष लोढे, पोकॉ विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड, चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळचे वेळी वडील दिलीप आभाळे हे व त्यांचे मित्र निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षिरसागर असे दोघे गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाटा येथे काही तृतिय पंथीयांनी वडीलांना अडवून पैशाची मागणी केली होती.
त्यावरुन तृतियपंथी व वडील यांचेत वाद झाले होते. त्याचा राग मनात धरुन तृतिय पंथीयांनी त्याच दिवशी त्यांचे इतर साथीदारासह एकरुखे गावामध्ये जावून वडील दिलीप आभाळे व निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षिरसागर यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. त्यानंतर वडीलावर औषध उपचार चालू असताना ते दि. १६/०५/२०२१ रोजी मयत झाले,
या महेश दिलीप आभाळे (वय २३ रा. आभाळे वस्ती, एकरुखे, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिस ठाण्यात गुरनं. २५१ / २०२१, भादवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे आरोपी सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार (रा. श्रीरामपूर) व त्याचे नऊ साथीदारांविरुध्द दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यांनतर जिल्हा पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके पोनि अनिल कटके यांनी गुन्हा घडला, त्या ठिकाणी एकरुखे (ता. राहाता) येथे भेट देवून घटनेची व आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री पाटील यांचे आदेशाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सोपान गोरे, सफौ मन्सूर सय्यद,
पोहेकाॅ भाऊसाहेब काळे, विजयकुमार बेठेकर, मनोहर गोसावी, पोना शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवि सोनटक्के, संतोष लोढे, पोकॉ विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड, चापोहेकॉ संभाजी कोतकर अशांनी मिळून गुन्ह्यातील आरोपींचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून व मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून श्रीरामपूर,
नायगाव, कोल्हार अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केला असल्याची माहिती दिल्याने आरोपींना राहाता पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही राहाता पोलिस करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम