अहमदनगर ब्रेकिंग : जन्मदात्या पित्याची मुलाकडून हत्या !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- सकाळी प्रात:र्विधीसाठी शेतात गेलेल्या वृद्ध वडिलांची त्याच्या दोघा मुलांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कारेगाव येथे घडली असून याबाबत दुसऱ्या पत्नीच्या फिर्यादीवरून तिच्या दोघा सावत्र मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सुनिता उर्फ शालनबाई लक्ष्मण लोणारे (वय 36) धंदा-शेती रा. कारेगाव ता.नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की 17 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता माझे पती लक्ष्मण दादा लोणारे (वय 71) हे कारेगाव येथे आमच्या शेतात प्रातर्विधीसाठी गेले होते.

माझ्या सवतीची मुले भाऊसाहेब लक्ष्मण लोणारे व अशोक लक्ष्‍मण लोणारे दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासा यांनी जुन्या शेतीच्या वादातून धारदार हत्याराने माझ्या पतीच्या डोक्‍यात व हातावर वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe