अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ८२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार २९७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटीजेन चाचणीत २७७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १६, नेवासा ०१, पारनेर २२, पाथर्डी ३०, राहता ०१, राहुरी ०२, संगमनेर ७७, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, इतर जिल्हा ०३ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले १८, जामखेड ०३, कर्जत ११, कोपरगाव ०४, नगर ग्रा.२५, नेवासा ३०, पारनेर २८, पाथर्डी १०, राहाता ६२, राहुरी २३, संगमनेर ६८, शेवगाव ४४, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले ३७, जामखेड ०६, कर्जत १८, कोपरगाव ११, नगर ग्रा. ०६, नेवासा १३, पारनेर ३९, पाथर्डी २२, राहाता ३१, राहुरी १३, संगमनेर ६६, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०२, श्रीरामपुर ०४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६४, अकोले ७८, जामखेड १२, कर्जत ४१, कोपरगाव ३३, नगर ग्रा. २७, नेवासा ४३, पारनेर ६५, पाथर्डी ४२, राहाता ४५, राहुरी ८१, संगमनेर १५६, शेवगाव २८, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर २३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली

रुग्ण संख्या:३,२४,८२५ उपचार सुरू असलेले

रूग्ण:५२९७ पोर्टलवरील

मृत्यू नोंद:६६९७

एकूण रूग्ण संख्या:३,३६,८१९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe