अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- एस. टी. बस मध्ये प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या दोन महिलांनी एका महिलेची सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.15) दुपारी 1.15 ते 1.45 वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत शोभाबाई विनायक ढोबळे (रा.सुभेदार रामजी आंबेडकर शाळेजवळ, मिसरवाडी, औरंगाबाद) यांनी गुरुवारी (दि.16) दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ढोबळे या औरंगाबादहून नगरला एस.टी. बसने येत असताना बुधवारी (दि.15) दुपारी 1.15 च्या सुमारास घोडेगाव (ता.नेवासा) येथून दोन महिला या बसमध्ये बसल्या व 1.45 च्या सुमारास नगर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर त्या बसमधून उतरल्या.
यावेळी त्यांनी ढोबळे यांची 54 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स चोरुन नेली. ढोबळे यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात 2 महिलांविरुद्ध भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम