अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध सुरू होता मात्र काल तिचा एका विहिरीत मृतदेह आढळुन आला आहे.
ही घटना राहाता तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती येथे घडली आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव आहे. ती दि. १४ सप्टेंबरपासून बेपत्ता होती.
याबाबत अधिक माहिती अशी, वृषाली पंढरीनाथ पवार ही युवती दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ नंतर गवताला जाते म्हणून घराबाहेर पडली परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिची शोधाशोध चालू केली. परंतु ती मिळून आली नाही.
दरम्यान ती बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. परंतु १७ सप्टेंबर रोजी सकाळी रमेश सुकदेव पवार हे शेतात जात असताना येथील एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.
याची माहिती स्थानिकांना तसेच श्रीरामपूर ग्रामीण तालुका पोलिसांना दिली. पोलीस पाटील अभंग हे घटनास्थळी हजर होत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी साखर कामगार हॉस्पिटल येथे नेण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम