खेळताना विहिरीत पडल्याने मुलीचा मृत्यू..!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-    एका १३ वर्षीय मुलीचा खेळता-खेळता विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी शहरातील दुले चांदगाव रोडवरील बालवे वस्तीवर काल सायंकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान सदरील मुलगी खेळत असतांना सुमारे सात ते आठ परस असणाऱ्या विहिरीत पडली होती.

नातेवाईकांना घटना कळताच मोठी धावाधाव यावेळी झाली.विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता.

प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री साडे आठ वाजता मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.यावेळी कामगार तलाठी हारिभाऊ सानप व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी देखील यावेळी मोठी मदत केली. सदरील घटनेमुळे नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe