नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी यांची झाली नियुक्ती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची वर्णी लागली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

पंजाब विधिमंडळात काँग्रेसचे नेते म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, असं रावत यांनी म्हटलं आहे.

आधी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यातीत 62 वर्षांचे सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव आघाडीवर होते. मात्र या राजकीय नाट्याला नवे वळण मिळालं असून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील रंधावा यांचं नाव कट झालं.

“हा हायकमांडचा निर्णय आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. चन्नी हे माझ्या लहान बंधूसारखे आहेत. मी अजिबातच नाराज नाही”, असं काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील उमेदवार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी म्हटलं आहे.

शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सुनील जाखड, सुखजिंदर सिंह रंधावा,नवज्योत सिंग सिद्धू, प्रताप सिंह बाजवा यांची नावं चर्चेत होती.

मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.पंजाबमध्ये सहा महिन्यांमध्ये निवडणुका आहेत

त्यामुळे अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर आज काँग्रेसच्या हायकमांडने सर्व आमदारांची सहमती घेऊन चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News