राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे कि नाही ? राजेश टोपे म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते,

पण लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाकडून गट क आणि ड या पदासाठीच्या 6 हजार 200 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

जॅमर बसवल्यामूळे परीक्षेदरम्यान कॉपी सारख्या प्रकाराला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडेल असंही ते म्हणाले.

राज्यात सध्या दररोज 13 ते 14 लाख जणांना लसीकरण करण्यात येत असून डेल्टाची रुग्णसंख्या सध्या राज्यात स्थिर आहे त्यामुळे नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं असंही टोपे म्हणाले.

राज्यात दररोज 15 ते 20 लाख लसीकरण करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी फिरत असल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News