सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद, ग्रामस्थांत घबराट

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे पंधरा दिवस उलटले नाही तोच, पुन्हा एकदा बिबट्याचे रोज दर्शन धांदरफळ खुर्द परिसरामध्ये घडत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भर लोकवस्तीमध्ये आता बिबट्याने आपले बस्तान मांडले असून, धांदरफळ खुर्द मध्ये मागील दोन आठवड्यापासून कायमच बिबट्याच्या दहशतीखाली असल्याने मागील दोन आठवड्यापूर्वी बिबट्याने दोन चिमूरड्यांवर हल्ला करून एका चिमुरड्याचे अक्षरशा लचके तोडले होते.

तर एका चिमुरड्याच्या या नरभक्षक बिबट्याने बळी घेतला होता. वनविभागाने या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून दोन बिबटे व एक बछडे जेरबंद केले होते.

या गोष्टीला दोन आठवडे उलटतात तोच, पुन्हा एकदा धांदरफळ खुर्द परिसरामध्ये भर लोकवस्तीमध्ये गावातील कहार वस्तीतील संदीप कचेरे यांच्या घराबाहेरील सी सी फूटेजमध्ये दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे.

त्यामुळे आता बिबटे हे शिकारीच्या शोधासाठी गावापर्यंत पोहोचल्याने गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढली असून ,शेतकऱ्यांच्या पशुधनावर व शेतमजूर, लहान मुलांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने वनविभागाने वेळीच ठोस उपाययोजना कराव्यात,

व गावागावात जनजागृती करून बिबट्या पासून संरक्षण कसे करावे यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावच्या ग्रामसभेला उपस्थित राहून जनतेला मार्गदर्शन करावे.

तसेच ज्या ठिकाणी त्यांचा जास्त वावर असेल अशा ठिकाणी त्वरित वनकर्मचारी व वन अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन तातडीने पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी अशी विनंती पुन्हा एकदा धांदरफळ ग्रामस्थ करत आहेत.

वनविभागाने धांदरफळ खुर्द परिसरामध्ये तातडीने कहार वस्ती या ठिकाणी तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe