अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपुर तालुक्यातील पढेगावाजवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तिन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चैतन्य अनिल माळी (वय १२ वर्ष) दत्ता अनिल माळी (वय ८ वर्ष) चैतन्य शाम बर्डे (वय ४ वर्ष) ही तीन लहान मुळे खेळता खेळता कान्हेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेततळ्याजवळ गेली पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते.
त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही व हे तिनही मुले पाण्यात बुडून मयत झाले. दरम्यान याबाबतची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी तातडीने ग्रामस्थ जमा झाले. तुम्ही मुलांचे शव बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी श्रीरामपुर येथे पाठविण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम